तुषार सिंचन व ठिंबक सिंचन वर मिळवा ६०% ते ८०% पर्येंत अनुदान / Maha DBT Farmar

तुषार सिंचन पद्धत म्हणजे काय

तुषार सिंचन पद्धत ही ऑल्युमिनीअम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक वेज असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.

ठिबक व तुषार सिंचन योजना अर्ज

 • शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या (mahadbt.in) या संकेतस्थळावरती जायचं आहे. त्यासाठी आपण मोबाईल मध्ये (Google chrom) वरती जाऊन सर्च मध्ये (mahadbt.in) हे संकेतस्थळ टाकून इथे जाणार.
 • संकेतस्थळावरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आधार कार्ड च्या मदतीने तुमचं नवीन रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन कसे केले जाते या संबंधित तुम्ही youtube वरती असंख्य व्हिडिओ आहेत त्या पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन या पर्याया वर क्लिक करून सर्वप्रथम लॉगिन करून घ्यायचं आहे
 • शेतकरी मित्रांनो महाडीबीटी या पोर्टल वरती लोगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल तिथे लिहिलेलं असेल की अर्ज करा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन मजकूर उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तीन प्रकार दिसतील त्यामधील पहिला म्हणजे कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर दुसरा सिंचन साधने व सुविधा आणि यानंतर शेवटचा एक पर्याय दिसेल फलोत्पादक.
 • त्या शेतकऱ्यांना तुम्हाला ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पुढील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचं आहे
 • तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन मजकूर उघडेल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ही भरून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मुख्य घटक मध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडायचा आहे. आणि यानंतर बाब निवडा मध्ये ठिबक सिंचन हा पर्याय निवडायचा आहे.
 • यानंतर तुम्हाला या योजनेसाठी उपघटक निवडायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिले असतील त्यामधील तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे तुम्हाला कोणत ठिबक हवं त्याप्रमाणे ठिबक हे निवडायचा आहे.
 • यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पिकामधील अंतर हे निवडायचं आहे तुम्हाला ज्या पिकासाठी ठिबक करायचा आहे त्या पिकाच अंतर तुम्हाला व्यवस्थित निवडायचा आहे
 • अशी संपूर्ण पिकाबद्दल माहिती व तुमच्या जमिनीच्या क्षेत्रा बद्दल माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे.

ठिबक व तुषार सिंचन योजना अनुदान

 1. शेतकरी मित्रांनो ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान हे दोन प्रकारांमध्ये दिले जाते त्यामधील पहिलं म्हणजे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी अनुदान म्हणजेच की यामध्ये अशे शेतकरी येतात की ज्यांच्याकडे जमीन अगदी थोडी आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना अनुदान हे 55% इतके दिले जाते म्हणजेच की जर शेतकऱ्यांनी 10 हजार रुपयाचे ठिबक व तुषार सिंचन खरेदी केले असेल तर त्यावर त्याला 55 टक्के म्हणजेच साडेपाच हजार रुपये हे अनुदान स्वरूपात दिले जाईल.
 2. यानंतर दुसऱ्या प्रकारांमध्ये बाकी उरलेले इतर शेतकरी येतात ज्यांना अनुदान हे 45 टक्के दिले जाते त्यामुळे एकंदरीत सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ठिबक व तुषार सिंचन योजना पात्रता

 1. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी पात्र होण्यासाठी व अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे असणार आहे.
 2. यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळ सातबारा उतारा ८अ असणे गरजेचे आहे
 3. यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कास्ट मधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे हे गरजेचे आहे
 4. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या जमिनीचे क्षेत्र हे पाच हेक्टर पेक्षा कमी असायला पाहिजे.
 5. यानंतर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोरवेल,विहीर,शेततळे किंवा इतर पाण्याचा साठा असायला हवा व त्याची नोंद तुमच्या सातबारा उतारा वरती असायला हवी जर नोंद सातबाऱ्यावरती नसेल तर तुम्ही ती नोंद जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करू शकता जर तुमच्या जमिनीच्या क्षेत्रात पाण्याचा साठा असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

ठिबक व तुषार सिंचन पद्धतीची काही वैशिष्टये आहेत

ठिबक व तुषार सिंचन वापरताना घेण्याची काळजी

 1. योग्य त्या स्प्रिंकलरची निवड करावी.
 2. स्प्रिंकलरमधून दर तशी बाहेर पडणारे पाणी अगर त्याचा वेग हा नेहमी त्या जमिनीच्या पाणी पोषण क्षमतेपेक्षा कमी असावा.
 3. उपलब्ध पाण्याचा विचार करून स्प्रिंकलर निवडावा. तुषार सिंचन सेट सुरू करण्यापूर्वी माहिती पुस्तीकेनुसार अगर तद्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी. काळजी घ्यावी म्हणजे तुषार सिंचन संच सक्षमतेने चालविता येतो.
 4. सर्व नट-बोल्ट योग्य तऱ्हेने घट्ट बसवावेत.
 5. सर्व पाइप्स स्वच्छ ठेवावेत.
 6. संच बंद करताना पहिल्यांदा गेट व्हाल्व्ह हळुवारपणे बंद करून मग पंप बंद करावा.
 7. स्प्रिंकलरला ओईल अगर ग्रीस लाऊ नये.
 8. लॅटरल सिंचन केल्यानंतर आतून फ्लॅश करावा.

तुषार सिंचन पद्धतीचे महत्व

प्रचलित पद्धतीद्वारे पिकास पाहिजे तेवढे पाणी सर्व ठिकाणी सारखे देता येत नाही. कोठे कमी तर कोठे जास्त पाणी बसते. त्यामुळे पिकास ठराविक उंचीचे पाणी देण्यासठी जास्त पाणी द्यावे लागते. जास्त दिलेले पाणी मुळच्या शोषण कक्षेच्या खाली जाते. हा अपव्यय जवळजवळ 20 ते 25 टक्क्यांपर्यंत होतो. याबाबी लक्षात घेतल्यास तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे हे सद्य काळाची गरज आहे. कारण दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा पडत आहे. लोकसंख्या वाढत आहे पिकाखालील क्षेत्र अति पाणी वापरामुळे दिवसेंदिवस नापीक होत आहे. आणि जमिनी क्षारमय होत आहे. पिकास पाणी देण्याच्या प्रचलित प्रवाही पद्धतीच्या तुषार व ठिबक सिंचन पद्धतीनं अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. कारण धरणातून पाटाद्वारे वाहते पाणी. प्रचलित प्रवाही पद्धतीद्वारे पिकास दिले जाते. पाटपाण्याच्या वाहतुकीद्वारे साधारणत: 60 ते 65% पाण्याचा नाश होतो. पर्यायाने प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीद्वारे पाहिजे तेवढी सिंचन क्षमता मिळत नाही. यामुळे राज्यामधील जलसिंचन प्रकल्पाची सिंचन क्षमता 35 ते 40% च्या वर जावू शकत नाही. म्हणूनच पाण्याच्या कार्यक्षम उपयोगाकरिता तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचे अवलंब करणे गरजेचे झाले आहे. सिंचनासाठी आराखडा व पूर्व नियोजन आवश्यक आहे. कृषी विद्यापीठ राहुरी येथील प्रयोगावरून तुषार सिंचनामुळे 30% पाण्याची बचत झाल्याचे दिसून येते.

Section Title

How Can Digital Marketing Help Your Startup To Become A Brand ?

The advent of a startup has called up for a new trend in the business world. or at any corner of the world caters to the branding of all kinds of startups which becomes the onset of their business...

उदयम नोंदणी – Udyog Aadhaar (Online Registration for MSME)

उदयम नोंदणी केंद्रीय सूक्ष्म...

Ayushman Bharat Health Account (ABHA)

आयुष्मान भारत आरोग्य खाते काय...

9 colors of Navratri

9 colors of Navratri Navratri is celebrated in different ways in different parts of the country. However, the basic idea behind the Navratri festival is the victory of the Hindu goddess Kali or Durga...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×