Ayushman Bharat Card वर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

भारत सरकारकडून वेळोवेळी विविध योजना राबविण्यात येतात, ज्याचा थेट लाभ गरजूंना मिळतो. रेशन योजना असो किंवा घरोघरी गॅस पोहोचवण्याची योजना असो. सरकारने आणलेल्या या योजनांचा लाभ अनेकजण घेतात, त्याचाही त्यांना खूप फायदा होतो. अशीच दुसरी योजना आयुष्मान भारत योजना आहे, जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत देशभर चालवली जात आहे. यामध्ये देशातील 10 कोटींहून अधिक कुटुंबांना लाभ मिळत आहे. यामध्ये पात्र व्यक्तींचे एक कार्ड बनवले आहे, ज्याअंतर्गत त्यांना रूग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. अशा परिस्थितीत, हे कार्ड तुमचे बनू शकते की नाही हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल, तर ते जाणून घेण्याचा एक मार्ग आहे. 

योजनेतंर्गत मिळतात या सुविधा

या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करता येईल. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करणार. या योजनेत सर्व कुटुंबातील सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळतो. आयुष्यमान योजना ही कॅशलेस योजना आहे. उपचारासाठी एक रुपया पण द्यावा लागणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

आयुष्मान भारत योजनेची पात्रता

आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी त्याच्या पात्रतेची माहिती घेणे आवश्यक आहे. सरकारने ही योजना गरीब आणि कमकुवत उत्पन्न गटातील लोकांसाठी सुरू केली आहे. आदिवासी (SC/ST) बेघर, निराधार, दान किंवा भिक्षा मागणारी व्यक्ती, मजूर इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला तुमची पात्रता तपासायची असेल तर PMJAY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे मी पात्र आहे या टॅबवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एका पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे तुम्ही तुमची पात्रता सहज तपासू शकता. या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची पात्रता काही मिनिटांत कळेल.

आयुष्मान भारत कार्ड ऑनलाईन डाउनलोड करा

 1. तुम्हालाही आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी https://pmjay.gov.in/ वर जा.
 2. आता येथे लॉगिन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
 3. आता एक नवीन पेज उघडेल, आता आधार क्रमांक टाकून पुढे जा. पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमच्या अंगठ्याचे ठसे सत्यापित करावे लागतील.
 4. आता ‘स्वीकृत लाभार्थी’ या पर्यायावर क्लिक करा.
 5. आता तुम्हाला मंजूर गोल्डन कार्ड्सची यादी दिसेल.
 6. या यादीमध्ये तुमचे नाव शोधा आणि कन्फर्म प्रिंट पर्यायावर क्लिक करा.
 7. आता तुम्हाला CSC वॉलेट दिसेल, त्यात तुमचा पासवर्ड टाका.
 8. आता येथे पिन टाका आणि होम पेजवर या.
 9. उमेदवाराच्या नावावर कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
 10. येथून तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.

फसवणूकीच्या घटना

गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान कार्डच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या योजनेत दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने कार्ड देऊन फसवणूक करणारे लोक सुविधांचा लाभ घेत आहेत. तुमचीही फसवणूक झाली असेल, तर तुम्ही त्याची त्वरित चौकशी करून तक्रार करा. तुमच्या नावावर उपलब्ध असलेल्या सुविधेचा कोणीही अनोळखी व्यक्ती फायदा घेत असेल तर लगेच आयुष्मान कार्डशी संबंधित तक्रार नोंदवा.

या क्रमांकावर तक्रार करा

जर तुम्हाला किंवा तुमच्यापैकी कोणाला अशी समस्या आली असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. अशा फसवणुकीसाठी सरकारने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर तुम्ही 180018004444 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही प्रमाणित दस्तऐवज असणे आवश्यक आहे.

आयुष्मान भारत योजनेचे उदिष्ट

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ योजनेची (आयुष्मान भारत योजना ) घोषणा केली आहे. ही योजना पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर 2019 पासून देशभर लागू करण्यात आली. सरकार एबीवायच्या माध्यमातून गरीब, उपेक्षित कुटूंब व शहरी गरीब कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करणार आहे.
 • सामाजिक-आर्थिक जाती जनगणना (एसईसीसी) 2011 नुसार ग्रामीण भागातील 8.03 कोटी कुटूंब आणि शहरी भागातील 2.33 कोटी कुटूंबे आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येतील. सध्या आयुष्मान भारत योजनेत 62,667 कूटूंब पात्र आहेत. अशा प्रकारे पीएम जय योजनेच्या कक्षेत 50 कोटी लोक येतील.

ग्रामीण भागात आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता

 • ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटूंबात वयस्क (16-59वर्ष) नसणे, कुटूंब प्रमुख महिला असणे, कुटूंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती/जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ति/ वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते.
 • त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील बेघर व्यक्ति, निराधार, भीक मागणारे, आदिवासी आदि लोक कोणतही प्रक्रिया न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शहरी भागात आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता

 • भिकारी, कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रस्त्यावर काम करणारे अन्य व्यक्ती.
 • कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे अन्य कामगार. सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, हँडीक्राफ्टचे काम करणारे, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक आदि आयुष्मान भारत योजनेसाठी (ABY) पात्र ठरवण्यात आले आहेत.

आयुष्मान भारत योजनेत रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×