सुकन्या समृद्धि योजना 2023

सर्वात पहिले सुकन्या समृद्धी योजने बद्दल थोडी माहिती

मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकार द्वारे 2015 साली सुरू करण्यात आली. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियान अंतर्गत केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजने अंततर्गत, 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावाने पालक किंवा त्यांचे कायदेशीर पालक खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्ही रु. 250 ते रु. 1.50 लाख पर्यंत निवेश करू शकता. भविष्यात मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी बचत करणे थोडक्यात मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनेचा चा मुख्य उद्देश आहे. तसेच या योजने अंतर्गत फक्त मुलींचे खाते उघडले जाते. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता. या योजनेत खाते मुलीच्या नावानेच उघडले जाते. व यात 7.6% व्याजदर दिला जातो. मुलीच्या वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला गुंतवलेले पैसे परत मिळतात.

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत कुटुंबातील किती मुलींना योजनेचा लाभ मिळेल?

मित्रांनो, या योजने अंतर्गत कुटुंबातील दोन मुलींना योजनेचा लाभ मिळू शकतो. जर एखादया कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुली असतील तर त्यापैकी फक्त दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. पण जर एका कुटुंबात आधी एक मुलगी व नंतर जुळ्या मुली झाल्यास त्यांना स्वतंत्र पणे योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे त्या कुटुंबातील तीन मुली लाभ घेऊ शकतील. तसेच फक्त 10 वर्षांखालील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजना खाते कोण उघडू शकते?

सुकन्या समृद्धी योजनेत किती व्याजदर दिले जाते?

मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेत सध्या दरवर्षी 7.6% व्याजदर दिला जातो. तसेच दर तिमाहित नवीन दर जाहीर केले जातात. आणि व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते.

सुकन्या समृद्धी योजनेच्या रकमेचे कॅल्क्युलेशन खालील प्रकारे केले जाते.

सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी 5000 रुपये गुंतवणूक केल्यास 14 वर्षांनी 7.6 टक्के व्याज दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 126607 इतकी रक्कम मिळेल तर 21 वर्षाला एकूण 211420 रुपये मिळतील. तुम्ही जितकी जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला 21 वर्षानंतर मिळेल.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कुठे उघडावे?

सुकन्या समृद्धी योजने साठी अर्ज कसा करावा?

मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन योजनेचा अर्ज भरू शकता. तसेच या योजनेत तुम्हाला तुमच्या बजेट नुसार महिन्याला किंवा वर्षातून एकदा पैसे भरावे लागतात. यात वर्षाला कमीत कमी रू 250 व जास्तीत जास्त रू 1.5 लाख पर्यंत भरू शकतात. तसेच ज्या तारखेला खाते उघडले आहे त्या तारखेपासून ते 15 वर्षांपर्यंत तुम्हाला दरवर्षी खात्यात किमान रक्कम जमा करावी लागेल. यानंतर, खात्याची मॅच्युरिटी पूर्ण होई पर्यंत खात्यात व्याज मिळत राहील.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

सुकन्या योजनेतून पैसे कसे काढता येतील?

  1. मुलीचे लग्न जमल्यास तुम्ही योजनेतून पैसे काढू शकता.
  2. पालकांचा किंवा खाते धारकाचा मृत्यू झाला असल्यास योजनेत जमा केलेले पैसे काढू शकतात.
  3. जर एखादा अर्जदार खात्यात पैसे भरू शकत नसल्यास खाते बंद करून जमा झालेली रक्कम काढता येते.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे

सुकन्या समृद्धी योजनेचे तोटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×