अमेरिका बनली कारण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट — सोनं झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण 24pan.in

जागतिक पातळीवरही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. अमेरिकेत काँग्रेसने बुधवारी कर्जाची सीमा वाढविणारे बील पास केले. यानंतर, सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.
Open in App

सोनं झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; अमेरिका बनली कारण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

सोन्या-चांदीच्या किमतीत गुरुवारी मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्सचेंजवर सोने आणि चांदी या दोन्हींच्या वायदा दरात घसरण दिसून आली आहे. एमसीएक्सवर गुरुवारी दुपारी 4 ऑगस्ट 2023 रोजी डिलिव्हरीच्या सोन्याचा दर (Gold Rate Today) 426 रुपयांच्या घसरणीसह 59,776 रुपये प्रती 10 ग्रॅमवर ट्रेड करताना दिसला. जागतिक पातळीवरही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. अमेरिकेत काँग्रेसने बुधवारी कर्जाची सीमा वाढविणारे बील पास केले. यानंतर, सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण – सोन्याबरोबरच चांदीचा वायदा दरातही (Silver Price Today) गुरुवारी घसरण दिसून आली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर गुरुवारी दुपारी 5 जुलैच्या डिलिव्हरीची चांदी 1.03 टक्के अथवा 741 रुपयांनी घसरून 71,361 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करताना दिसून आली.

सोन्याचा जागतिक दर -सोन्याच्या जागतिक दरात गुरुवारी दुपारी मोठी घसरण दिसून आली. कॉमेक्सवर सोन्याचा जागतिक वायदा दर 0.41 टक्के अथवा 8.10 डॉलरच्या घसरणीसह 1974 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करताना दिसला. तसेच, सोन्याची जागतीक स्पॉट प्राइस 0.37 टक्के अथवा 7.27 डॉलरच्या घसरणीसह 1955.46 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करताना दिसली.

चांदीची जागतिक किंमत – चांदीच्या जागतिक दरातही गुरुवारी दुपारी घसरण दिसून आली. कॉमेक्सवर चांदीची जागतिक स्पॉट प्राइस 0.52 टक्क्यांनी अथवा 0.12 डॉलरने घसरून 23.47 प्रति औंस झाली. तर, चांदीची जागतिक स्पॉट प्राइस 0.64 टक्क्यांनी अथवा 0.15 डॉलरने घसरून 23.34 डॉलर प्रति औंस झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×